Vartadoot
Tuesday, December 16, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे जागतिक सर्प दिनानिमित्त १५ हजार फळ झाडे बिजारोपन – प्लास्टीकचा वापर बंद करण्यासाठी शालेय विद्यार्थांनी घेतली शपथ

admin by admin
16/07/2022
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. १६ जुलै जागतिक सर्प दिनानिमित्त १५ हजार फळ झाडे बिजारोपन व प्लास्टीक चा वापर बंद करण्यासाठी लोहारा येथील शालेय विद्यार्थांची शपथ घेण्यात आली. जागतिक सर्प दिनाचे (worlds snake day) चे औचित्य साधून लोहारा शहराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्ते मार्गावरती पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी व वन्यप्राण्यांना खाद्याची उपलब्धता होण्याच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यावरती येणाऱ्या चिंच, जांभूळ व सीताफळ या फळ झाडांच्या १५ हजार बीजांचे रोपण करण्यात आले. ऑर्गनाझेशन ऑफ बायोडाव्हर्सिटी कंझर्वेशन व निसर्ग संवर्धन संस्था लोहारा यांच्या माध्यमातून लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा, हायस्कुल लोहारा, वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालय व न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने शेकडो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून १५ हजार फळझाडांच्या बीजांचे रोपण करण्यात आले. व अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापर मुक्तीची शपथही देण्यात आली.

दैनंदिन जीवनात प्लास्टीकचा वापर वाढत आहे. ज्या प्लास्टीक बॅग मधे बंद केलेले असते त्या अन्नावर नैसर्गिक पृथ्वकरण प्रक्रिया होऊ नये म्हणून त्यावर विविध रसायनांचा वापर केला जातो. असे अन्न शरीरास उपयुक्त नसते. शिवाय या अन्नामुळे कर्करोगाचा घटनेत खुप वाढ होत असल्याचे मेडिकल रिसर्च मधे स्पष्ट होत आहे. वापर करुन झालेले प्लास्टीक इतरत्र पडत असल्यामुळे ते पाळिव प्राण्यांचा पोटात जात आहे. पक्षी सुद्धा या प्लास्टीक चा शिकार होत आहे. जमिनी नापिक होत आहेत असे मत ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशनचे सचिव अभिजीत गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

शासनाच्या वृक्ष लागवडिच्या योजनेतंर्गत लावण्यात आलेले करोडो हेक्टर वरील गिरीसिरीयाचे झाडे घातक असल्याचे लक्षात आल्यावर वन विभाग ते आज नष्ट करत आहेत. शासनाने असे फळ नसलेले झाडे न लावता भारतीय व महाराष्ट्राच्या मातीतील या वातावरणात वाढणारे सावली व फळे देणारी झाडे लावावीत. संपुष्टात आलेला पक्षांचा अधिवास पुन्हा स्थापित करता येईल आणि हे निसर्ग चक्र सुबाधित राहिल असे मत ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास माळी यांनी व्यक्त केले.

 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशनचे सदस्य विरेश स्वामी, अमित बोराळे, शैलेश जट्टे, दीपक रोडगे, भागवत जवादे, मुख्याध्यापक शहाजी जाधव, प्राचार्य डी. आर. घोलकर, मुख्याध्यापक यु. व्ही. पाटील, मुख्याध्यापक वसंत राठोड, शिक्षक व्ही. टी कलमे, डी. व्ही. धनवडे, अंजली पटवारी, रत्नमाला पवार, यशवंत चंदनशिवे, राजकुमार वाघमारे, व्यंकट चिकटे, गोपाळ सुतार, एस. एम. पांचाळ यांनी प्रयत्न केले आहेत.

Tags: निसर्गपर्यावरण संवर्धनफळ झाडेबीजारोपण
Previous Post

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिद्धेश्वर विरक्त मठात विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

लोहारा शहरात नगरपंचायतीची सुसज्ज इमारत साकारणार – नगरविकास विभागाकडून लोहारा शहरासाठी दहा कोटी रुपयांचा निधी – आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Related Posts

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; माकणी येथे जवाहर नवोदय प्रवेश सराव परीक्षेचे आयोजन
लोहारा तालुका

माकणी येथे राज्यस्तरीय जवाहर नवोदय सराव परीक्षेची जय्यत तयारी; ११२८ विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

28/11/2025
Next Post

लोहारा शहरात नगरपंचायतीची सुसज्ज इमारत साकारणार - नगरविकास विभागाकडून लोहारा शहरासाठी दहा कोटी रुपयांचा निधी - आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's