वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त सोमवारी (दि.२०) लोहारा शहरात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत महिलांनी सहभाग घेतला होता.
लोहारा शहरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील महादेव मंदिरात सोमवारी (दि. २०) महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १७ महिलांनी सहभाग घेतला होता. सहभागी महिलांनी शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव बेटी पढाओ, शिवजयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ भारत साक्षर भारत याविषयावर रांगोळी काढल्या होत्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डी. एम. पोतदार, श्रीकांत मोरे, व्यंकटेश पोतदार यांनी काम पाहिले. या रांगोळी स्पर्धेत स्वामिनी उमा होंडराव प्रथम, अक्षता गगन माळवदकर द्वितीय तर सुकन्या शैलेश जट्टे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मंगळवारी (दि.२१) बक्षीस वितरण करण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील सहभागी महिलांनी काढलेल्या रांगोळी खालीलप्रमाणे –