वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती लोहारा आयोजित राष्ट्रीय पोषण माह सप्टेबर २०२२ अंतर्गत मिलेट फूड फेस्टिवलच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत स्वयंसहायता समुहातील महिलामध्ये पोषण, आरोग्य, स्वच्छता व आहार याबाबत जनजागृती करण्यासाठी मिलेट फूड फेस्टिवल अंतर्गत मिलेट वर आधारित पारंपारिक पाककला स्पर्धा, मिलेटस प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १९ ते २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समिती लोहारा येथे मिलेट फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सदर फेस्टीवल करिता लोहारा तालुक्यातील उमेद अभियानातील महिला स्वयंसहायता गटातील महिलांनी बाजरी, ज्वारी, नाचणी, राजगिरा इत्यादी तृणधान्यापासून बनवलेले प्रकियायुक्त पदार्थ व पारंपारिक पाककला सादर करण्यात आल्या. या फेस्टीवलकरिता नायब तहसीलदार सुजाता हंकारे, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी डी.एल. मुळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी नागनाथ कुंभार, आयसीडीएस विस्तार अधिकारी व्ही. व्ही. शहापूरकर, कनिष्ट सहाय्यक सचिन कुलकर्णी, विस्तार अधिकारी सांखिकी विनोद पवार, आरोग्य विस्तार अधिकारी श्यामल भालेराव, आरोग्य कर्मचारी वर्षा सुरवसे, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, महिलांनी तृणधान्याचा आहारामध्ये समावेश करावा तसेच चवीपेक्षा पोषणमूल्य असणारे पदार्थाचे आहारामध्ये समावेश करावा तसेच याची व्यापक जनजागृती महिला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून गावामध्ये करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महिलांनी तृणधान्या पासून बनवलेले प्रकियायुक्त पदार्थ व पारंपारिक पाककला पोषणमूल्य असणारे पदार्थ यामधून उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ गटांना पारितोषीके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ जगताप यांनी तर राहुल मोहरे यांनी आभार मानले. कार्यक्रमा करिता प्रणिता कटकदौंड, अमोल कासार, माधुरी माळी, प्रीतम बनसोडे, अन्तेश्वर माळी, रामेश्वर दुरगुळे, शिवशंकर कांबळे, प्रदीप चव्हाण, किशोर हुडेकर, प्रदीप लोंढे, नंदन थोराथ, मंगल गायकवाड, योगिता थोरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील महिला स्वयंसहायता गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.