Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रवेश – नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

admin by admin
24/06/2021
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील काँग्रेस (आय) चे ज्येष्ठ नेते तथा समन्वय समितीचे अध्यक्ष नागन्ना वकील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२४) समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान गुरुवारी ( दि. २४) तुळजापूर येथे उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघाचा आढावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोहारा शहरातील काँग्रेस (आय) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच नागन्ना वकील यांनी त्यांच्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सहचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, महिला तालुकाध्यक्ष शरिफा सय्यद, महिला शहराध्यक्षा सुलोचना रसाळ, युवती तालुकाध्यक्षा अक्षता गगन माळवदकर, शहराध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक गगन माळवदकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागन्ना वकील यांच्यासोबत बसवराज पाटील, दिलीप जाधव, बाबासाहेब जाधव, विश्वजीत पाटील, बसवराज तोडकरी, तानाजी सरवदे, अनिल आडे, प्रशांत कारले, बाबा पवार आदीनी प्रवेश घेतला आहे.लोहारा नगरपंचायत निवडणूक पुढील काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (आय) पक्षातील ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस आय पक्षाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील उमेदच्या एलईडी बल्ब व्यवसायास प्रकल्प संचालक संतोष जोशी यांची भेट – गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांची उपस्थिती

Next Post

झी मराठी प्रस्तुत ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ च्या रिअॅलिटी शोमध्ये घुमणार सोलापूरी आवाज – नव्या पर्वास 24 जूनपासून झाली सुरवात

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

झी मराठी प्रस्तुत ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ च्या रिअॅलिटी शोमध्ये घुमणार सोलापूरी आवाज - नव्या पर्वास 24 जूनपासून झाली सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's