लोहारा शहरातील प्रभाग सहा मध्ये विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांची अडचण दूर होणार आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये मागील काही वर्षापासुन कोकणे ते फुटाणकर यांच्या घरासमोर गटारीचे काम अर्धवट राहिल्यामुळे गटारीचे पाणी तुंबल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. या गटारीत पाणी साचुन राहिल्यामुळे पावसाळ्यात काही घरामध्ये पाणी घुसत होते. या अडचणी लक्षात घेऊन प्रभाग सहाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या प्रयत्नातुन जिल्हा नियोजनच्या माध्यमातुन या गटारीसाठी निधी मंजुर करुन घेण्यात आला. या कामाचे उद्धघाटन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, रघुविर घोडके, बक्षु फुटाणकर यासह प्रभागातील नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे पावसाळ्यातील येणारी अडचण दुर होणार आहे. तसेच प्रभागातील काही घरामध्ये पाणी शिरत होते. तीही अडचण दुर होईल.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, वि.का.से.सो.चे माजी सदस्य रघुविर घोडके, नागराळचे शाखाप्रमुख पिंटु गोरे, बक्षु फुटाणकर, राजु स्वामी, अंकुश नारायणकर, गणेश रणशुर, बब्बु रणशुर, विष्णु कोकणे, मल्लिनाथ स्वामी, पंडीत निर्मळे, दगडु निर्मळे, चाऊस, आकाश निर्मळे, आकाश स्वामी यासह महिला व नागरीक उपस्थिती होते.