वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत इमारत बांधकाम व शहरातील रस्ते, गटारी आदी कामांसाठी नगरविकास विभागाकडून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे अशी माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
लोहारा व उमरगा शहरातील विविध कामांसाठी नगरविकास विभागाकडून एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. यात म्हणले आहे की, नगरविकास विभागाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या निधीपैकी लोहारा शहरात नगरपंचायतीची सर्व सुविधांयुक्त सुसज्ज इमारत बांधमकाम करणेसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत दोन्ही बाजूने नाला करणे या कामासाठी २ कोटी रु., एम.आर.एफ. शोरूम ते जट्टे पेट्रोल पॅम्पपर्यंत बंदिस्त सिमेंट नाला करणे, यासह प्रभाग क्र.१३, प्रभाग क्र.१४, प्रभाग क्र. ९ मध्ये व शहरातील विविध ठिकाणी सिमेंट रस्ता व नाली करणे या कामांसाठी असे एकूण १० कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाकडून मंजुर झाला आहे अशी माहिती या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे. सदर कामांसाठी निधी मंजुर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
लोहारा नगरपंचायतसाठी सुसज अशा इमारतीची आवश्यकता होती. तसेच शहरातील विविध भागात अंतर्गत रस्ते व नाल्यांचे कामे होणे अत्यंत गरजेचे होते. लोहारा शहरासाही एकूण दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल लोहारा शहरवासीयांच्या वतीने नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आभार व्यक्त केले आहेत.