वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात शनिवारी (दि. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी रघुवीर घोडके, महेबूब गवंडी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीकांत कांबळे, दिगंबर कांबळे, बाळू शिंदे, उत्तम पाटील, शैलेश जट्टे, मल्लिनाथ फावडे, राहुल कोकणे, बंडू वैरागकर, दिगंबर खंडाळे, बळी रोडगे, अब्बास शेख, प्रकाश कांबळे, तानाजी माटे, दगडू तिगाडे, अमोल फरीदाबादकर, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, विक्रांत संगशेट्टी, इकबाल मुल्ला, तुकाराम वाकळे, तुळजाराम कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.