लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (दि.६) शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक हे पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष धनराज बिराजदार, संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील गुंड, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष खंडू शिंदे, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष शरद जावळे, छावा तालुका प्रमुख चंद्रशेखर जावळे, नगरसेवक प्रशांत काळे, अभिजीत सूर्यवंशी, सत्यजित मुसांडे, विजय जाधव, गणेश सुरवसे, राहुल सुरवसे, संजय मुरटे, महादेव एकंबे, संतोष मसलगे, प्रवीण कदम, अविनाश चिकटे, बाबा शेख, ऋषिकेश सूर्यवंशी, देवा महाजन, शिवाजी आंबेकर आदींसह लोहारा तालुक्यातील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.