वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका वर्षा शेटकार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, अंधश्रद्धा, पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान-गौरव करता यावा या उद्देशाने स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान दोन वर्षापासून महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कार देवून गौरव करण्यात येत आहे. यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षीच्या स्मृतिशेष स्मृती पुरस्कारांची घोषणा महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त करण्यात आली. यात लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका वर्षा शेटकार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षिका वर्षा शेटकार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुरस्कार वितरण समारंभ स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनी होणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजय वैरागकर, सदस्य सूर्यकांत वैरागकर, गिरिजाकांत वैरागकर, श्रीशैल्य बिराजदार, प्रविण स्वामी यांनी सांगितले आहे.