वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.११) लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट देऊन पाहणी केली.
लोहारा शहरातील शिवनगर येथे आरोही गृह उद्योगाच्या माध्यमातुन उडीद पापड, ज्वारीचे पापड, तांदुळाचे पट्टी पापड, कुर्ड्या, शेंगदाणा चटणी, शेवाया, तुर दाळ, हरभरा दाळ आदी तयार केले जाते. या गृह उद्योगाला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रा. श्रीपर्णा चौधरी यांनी सोमवारी (दि.११) भेट देऊन पाहणी केले.