वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागूर येथील राजमाता प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी ( दि.४) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी विविध गीतांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे या होत्या. तर उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे होते. या कार्यक्रमासाठी नागुरच्या सरपंच अर्चना कांबळे, लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव जावळे, विकास पाटील, लोहाऱ्याचे उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेविका सारिका प्रमोद बंगले, सुमन दिपक रोडगे, नितीन पाटील, बाबासाहेब जाधव, सुरेंद्र पाटील, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अकबर तांबोळी, प्रवीण चंदनशिवे, राजमाता स्कुलचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, शाम पाटील, तुकाराम मोरे, सतीश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वार्षिक स्नेहसंमेलनात नर्सरी, एलकेजी, युकेजी वर्गातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी चित्रपटातील गीतांबरोबर लावणी, फनी डान्स, देशभक्तीपर गीत तसेच पोवाडा, शिववंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी अमोल पाटील, स्वाती निकम, गोकर्णा भोंडे यांनी पुढाकार घेतला. तसेच कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक तानाजी पाटील, कर्मचारी विजया परतेकर, ज्ञानेश्वर सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.