लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील जि.प. प्रा. शाळेत शनिवारी (दि.८) शालेय समितीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी व्यंकटसिंह राजपूत तर उपाध्यक्ष पदी गंगाधर मिटकरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील तावशीगड येथील जि.प. प्रा. शाळेत शालेय समितीची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक सुदर्शन जावळे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी व्यंकटसिंह राजपूत तर उपाध्यक्ष पदी गंगाधर मिटकरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सदस्य म्हणून अतुल फुरडे, बालाजी चव्हाण, प्रशांत राजपूत, तानाजी माने, शंकर माने, शांतप्पा मिटकरी, वीरभद्र स्वामी, नंदकिशोर बिराजदार, विनोद जाधव, मधुकर कोळी, नितीन मिटकरी, अमोल थोरात यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी गावातील पालक गजानन मिटकरी, भैरव राजपूत, राम मिटकरी, लक्ष्मण बिराजदार, भैरव राजपूत, लखन राजपूत, लक्ष्मण माने, चंद्रकांत फुरडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.