वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील बी. एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थी संतोष शिंदे याची इंडीयन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा संस्थेचे सरचिटणीस आ. सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी याठिकाणी तब्बल 7 हजारहून अधिक उमेदवार ग्राउंड साठी आलेले होते. त्यापैकी फिजिकल ग्राउंड उत्तीर्ण झालेले 1300 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र झाले व त्यापैकी 324 उमेदवारांची भारतीय सशस्त्र दला मध्ये निवड झाली. त्यापैकी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील संतोष शिंदे याची निवड झाली. तसेच कु. संतोष शिंदे हा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन अथेलेटिक्स स्पर्धेतही लांबउडी मध्ये प्रथम तर 200 मी. धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस आ. सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य दौलतराव घोलकर, प्राध्यापक राजपाल वाघमारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
त्याच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दादा सोळंके, सदस्य प्रदीप भाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सतीश इंगळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.