वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.९) लोहारा पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला.
लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे हे होते. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चौगुले, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, जि प सदस्या शोभा तोरकडे, माजी जि प सदस्य दिपक जवळगे, पंचायत समितीच्या सदस्या ज्योती पत्रिके, जेवळीचे सरपंच मोहन पनुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान कोरोना परिस्थितीसह सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. तसेच सुरू असलेली कामे कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून लवकर पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना दिल्या. तसेच समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके आदींनी त्यांच्या विभागाचा आढावा घेतला.या बैठकीसाठी बांधकाम विभागाचे श्री. चिटगुपकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी पी एम चौगुले, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. व्ही. पाटील, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, बालविकास प्रकल्प अधिकारी कांबळे, शाखा अभियंता आर. एस. पाटील, गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा, लघुपाटबंधारे विभागाचे इ. टी. सूर्यवंशी, पं स कृषी अधिकारी डी. एन. मुळे यांच्यासह शुभम साठे, विक्रांत संगशेट्टी, बालाजी चव्हाण, विजय महानूर व सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन कृषी विस्तार अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक प्रशासन अधिकारी पी एम चौगुले यांनी केले.