राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.४) स्थगिती दिली आहे. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संध्याकाळी या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी काँग्रेसचे लोहारा शहराध्यक्ष आयनोद्दीन सवार, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, नगरसेवक प्रशांत काळे, विजयकुमार ढगे, के. डी. पाटील, रफिक शेख, विठ्ठल वचने पाटील, रौफ बागवान, संतोष फावडे, मुन्ना स्वामी, इस्माईल मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.