वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सुनीलकुमार काकडे यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातील एकूण ३६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांची लोहारा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मंगळवारी ( दि. ३१) काकडे यांनी लोहारा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांची पदोन्नती होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे डिवायएसपी पदावर बदली झाली आहे.