वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.पी.जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गुरुवारी (दि.३०) सपत्निक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके होते. यावेळी संस्थेचे संचालक दत्तात्रय बिराजदार, निवृत्ती सांळुके, माधवराव पाटील, बब्रुवान आवटे, सेवानिवृत्त प्राचार्य गोविंदराव देवणे, शिवाजीराव मारेकर, डी.ए.सूर्यवंशी, आर.टी.माने, शाहुराज घोडके, शिवाजी उपासे, अजय कुंभार, प्राचार्य श्रीपाद कुलकर्णी, मुख्याध्यापक एम.व्ही. कांबळे, संजय गुजरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध शाळेच्या वतीने श्री. जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदराव सांळुके म्हणाले की, समाज सुधारणेच्या कार्यात शिक्षकांचे योगदान मोठे असून शिक्षकांनी सेवानिवृतीनंतर सामाजिक कार्य हाती घेऊन समाज सेवा करावी असे आवाहन केले. यावेळी माधवराव पाटील, मुख्याध्यापक संजय गुजरे, डॉ. वैशाली जाधव प्राचार्य श्नीपाद कुलकर्णी, सुरेश रोहिणे आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर सूर्यवंशी यांनी तर अविनाश सुरवसे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विकास गोरे, प्रा. एन.टी.तेलंग, शिवाजी कांबळे, के.डी. कांबळे, संजय साळुंके आदींनी परिश्रम घेतले.