वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सास्तुर येथील श्वास क्लिनिक व इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सालेगाव यांच्या वतीने लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे बुधवारी (दि.१५) मोफत कर्करोग तपासणी, सल्ला व जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ३५ जणांची तपासणी करण्यात आली.
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सास्तुर येथील श्वास क्लिनिक यांच्या वतीने सास्तुर येथील क्रांती चौक येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर येथील एम. जे. हॉस्पिटलच्या डॉ. प्रियंका राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून तपासणी केली. यावेळी डॉ. रहीम पटेल, सास्तुरच्या सरपंच शितल पाटील, काँग्रेसचे नेते तथा पार्वती मल्टिस्टेटचे संस्थापक आबासाहेब साळुंके, गोपाळ माने, माजी सरपंच यशवंत कासार, विजय क्षीरसागर, सलमान सवार, मनोज देशपांडे, समाधान मनोहर, डॉ. संजय राठोड आदींसह नागरिक उपस्थित होते.





