वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील बी. ए. पदवीचा विद्यार्थी सूरज पुकाळे याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
घरची परिस्थिती खडतर असल्यामुळे व वडिलांचे छत्र हरविल्यामुळे कधी पेपर वाटणे तर कधी पेट्रोल पंपावर काम करत त्याने शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातून बी. ए. पदवी पूर्ण केली. कॉलेजात असताना खेळाचे शिक्षक प्रा. राजपाल वाघमारे यांच्या तो संपर्कात आला. प्रा. वाघमारे यांनी त्याला मैदानी चाचणी साठी तयार केले तर प्रा. चिकटे व्ही. डी. आणि प्रा. निकम आर. डी. यांनी त्याला लेखी परीक्षेसंदर्भातील सखोल मार्गदर्शन केले. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच महाविद्यालयातील शिक्षकांनी पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केल्यामुळेच यश संपादन करता आल्याचे मत सुरज पुकाळे याने त्याच्या मनोगतामध्ये व्यक्त केले. ‘खडतर परिस्थितीतच यशाचा मार्ग दडलेला असतो, आपण ज्या ठिकाणी प्रयत्न करायचे थांबतो त्याच ठिकाणी यश दडलेले असते’ असे मत प्राचार्य डी. डी. आर. घोलकर यांनी व्यक्त केले.
त्याच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. प्रकाश दादा सोळंके, सरचिटणीस मा. आ. सतीश भाऊ चव्हाण, सदस्य प्रदीप भाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी त्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.