वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि. १५) ध्वजारोहण करण्यात आले. कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदीछोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. धीरज सोमवंशी, सरपंच नामदेव लोभे, पोलीस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यासह गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांनी अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेतली.