वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थ्यांचे बँक खाते जनधन योजनेअंतर्गत काढून त्यांना मंगळवारी (दि.२९) विद्यालयाच्या प्रांगणात बँक खात्याच्या पासबुकचे वितरण करण्यात आले.
बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक सलगरा दिवटी या शाखेच्या वतीने हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थ्यांचे बँक खाते जनधन योजनेअंतर्गत काढून त्यांना विद्यालयाच्या प्रांगणात बँक खात्याच्या पासबुकचे वितरण शाखाधिकारी रमण नंदनवार, मुख्याध्यापक एस. बी. भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाने शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांचे बँक पासबुक खाते व आधार अपडेट केल्यामुळे बँकेच्या शाखाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच परिसरातील ही एकमेव शाळा ठरली आहे असे कौतूकही केले. शाखाधिकारी रमण नंदनवार यांनी विद्यार्थ्यांना बचतीची सवय, बँक खात्याचे व्यवहार व बँकेतील विविध पदांच्या नोकरीसाठी करावयाचे प्रयत्न याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सचिन कोळी, बी.एस. स्वामी, बी.जे. मनोहर, ए.व्ही. जाधव, एस. के. जाधव यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.