वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मागील दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. १७) मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मागील दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.१७) बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय ढाकणे, सरपंच रामभाऊ मोरे, शा.व्य. समितीचे अध्यक्ष अनिल अतणुरे, पोलीस पाटिल संजय नरगाळे, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, पंडीत जाधव, विस्तार अधिकारी वाघमोडे साहेब तसेच सर्व ग्रा.प.सदस्य, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य शा.व्य.समिती सर्व सदस्य तसेच गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उलन कांबळे, सौदागर शेख, गोविंद जाधव, श्रीमती सविता राठोड, स्वाती बिडवे, नागेश बंगले, संभाजी परिट, सुधीर घोडके यांनी प्रयत्न केले.