लोहारा शहरातील हॉटेल व्यावसायिक जब्बार मुल्ला यांची मुलगी वसिया मुल्ला हिने दहावीच्या परीक्षेत कौतुकास्पद यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे घरची परिस्थिती हालाखीची असताना देखील जिद्द व चिकाटीने अभ्यास करून एसएससी बोर्ड परिक्षेत तिने ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. जब्बार मुल्ला यांचे लोहारा बसस्थानक परिसरात हॉटेल आहे. वजिया ही तिच्या वडिलांच्या हॉटेल व्यवसायात नेहमी मदत करत असते. अशा परिस्थितीत तिने हे यश मिळवले आहे. त्याबद्दल वजिया मुल्ला हिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. वजिया मुल्ला ही हायस्कुल लोहारा शाळेची विद्यार्थिनी आहे.
