Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

२० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

admin by admin
05/08/2022
in क्राईम न्यूज, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एका गुन्ह्यामध्ये अटक करुन कोठडीत न ठेवणे व आरोपपत्र न पाठविण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रूपये स्वीकारताना लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गोरोबा बाबासाहेब इंगळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. गुरूवारी सकाळी १०.५५ वाजता लोहारा ते जेवळी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली असून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या महितीनुसार, एका प्रकरणात तक्रारदार ३० वर्षीय तरुणााविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक न करणे, पोलीस कोठडीमध्ये न टाकणे, आरोपपत्र न पाठवणे याकरिता लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गोरोबा इंगळे याने सदरील तरुणाकडे दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी करून गुरूवारी (दि.४) लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
औरंगाबाद विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आवाहन –

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पोलीस कर्मचारीलाचलुचपत प्रतिबंधक विभागसापळा
Previous Post

हर घर तिरंगा अभियानाबाबत लोहारा नगरपंचायत कार्यालयात बैठक संपन्‍न

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकीची प्रक्रिया स्थगित – राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकीची प्रक्रिया स्थगित - राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's