लोहारा तालुक्यातील ११ विद्यार्थिनींनी पुणे येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यश संपादन केले आहे.
लोहारा शहरातील ज्ञानदीप क्लासेस येथे शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील ११ मुलींनी ही प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेत शुभ्रा शरद भगत, अनुष्का राहुल गोरे, प्रणया पाटील, ईश्वरी जनक कोकणे, ऋतिका फंड, साक्षी बळीराम कोकणे, अलसफा कलीम शेख, आरोही जाधव, श्रावणी प्रकाश होंडराव, श्रावणी पाटील, पवित्रा बुकले या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. लोहारा सारख्या ग्रामीण भागातून क्लासेसमध्ये शिक्षण घेऊन ११ विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.