लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी (दि. २) आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी विविध प्रकारच्या गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
लोहारा येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे हे २५ वे वर्ष आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस विविध कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी (दि.२) रात्री लोहारा हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेने या महोत्सवाची सांगता झाली. या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, अभिमान खराडे, माजी सरपंच शंकर जट्टे, नगरसेवक अविनाश माळी, दत्ता निर्मळे, श्रीकांत भरारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी अविनाश माळी, दिपक रोडगे, विजयकुमार ढगे, विष्णू नारायणकर, चेतन बोंडगे, ओम कोरे, राजेंद्र फावडे, भागवत बनकर, विक्रांत संगशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत लावणी, देशभक्ती गीत, रिमिक्स, हिंदी मराठी आदींसह विविध कलाप्रकारावर दिलखेचक नृत्य सादर करुन स्पर्धकांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत लातूर, बीड, सातारा, सांगली, तुळजापूर, सावंतवाडी, उमरगा यासह अनेक ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. रात्री साडे नऊच्या सुमारास सुरू झालेली ही स्पर्धा सोमवारी पहाटे चारपर्यंत चालली. आस्था डांगे अंबेजोगाई, शौर्या गोडबोले लातूर, जान्हवी कसबे लातूर, समृद्धी तिपणे सोलापूर, पायल पाटील सांगली आदींनी बहारदार नृत्य सादर केले. तसेच

राजमुद्रा ग्रुप उमरगा, भवानीशंकर तुळजापूर, आरडीएक्स सावंतवाडी, डी डी एस पंढरपूर, कलाविष्व लातूर या डान्स ग्रुपने सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. यावेळी अनेक स्पर्धकांच्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच सामूहिक गटाच्या सादरीकरणावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून शुभम मलेलू, निलेश हतांगळे, सुरेश वाघमोडे यांनी काम पाहीले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीने परीश्रम घेतले. या दरम्यान रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. विठ्ठल वचने पाटील यांनी प्रास्ताविक केले. भीमाशंकर डोकडे, सतीश ढगे यांनी सूत्रसंचालन केले. तर गोपाळ सुतार यांनी आभार मानले. राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील महिला, नागरिक, युवक व परीसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी गोपाळ सुतार, श्रीनिवास माळी, ओम पाटील, विरेश स्वामी, ईश्वर बिराजदार, महेश कुंभार, गणेश हिप्परगेकर, अमित बोराळे, अजित विभूते यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
वैयक्तिक (लहान गट) –
प्रथम – आस्था डांगे, अंबेजोगाई
द्वितीय – शौर्या गोडबोले, लातूर
तृतीय (विभागून) – जान्हवी कसबे, लातूर व समृद्धी तिपणे, सोलापूर
वैयक्तिक (मोठा गट)
प्रथम – अनामिका अहिरे, बीड
द्वितीय (विभागून) – पायल पाटील, सांगली व श्रष्टी जाधव, सातारा
तृतीय (विभागून) – सानिका भागवत, सातारा व करन लांडगे, लातूर
सामूहिक (लहान गट)
प्रथम – जी बी ग्रुप लातूर
द्वितीय – ऑसम डान्स अकॅडमी लातूर
तृतीय (विभागून) – के के ग्रुप लातूर व बीएमके ग्रुप माढा
सामूहिक (मोठा गट)
प्रथम – राजमुद्रा ग्रुप उमरगा
द्वितीय (विभागून) – भवानीशंकर तुळजापूर व आरडीएक्स सावंतवाडी
तृतीय (विभागून) – डी डी एस पंढरपूर व कलाविष्व लातूर
युगल जोडी गट ( जोडी)
सर्व विभागून
प्रथम – सुमित व आरती सातारा
द्वितीय – पुष्कर व विशाल नाशिक
तृतीय – अनामिका व अंकिता बीड