Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

by मुख्य संपादक
in मराठवाडा
A A
0

छत्रपती संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १५ वर्षांनंतर प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात निघाल्याने हजारो पात्र उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या असताना विद्यापीठ प्रशासनाने मागील जाहिरातीत अर्ज केलेल्या उमेदवारांचा विचार न करता नव्याने अर्ज मागवले आहेत. त्यामुळे यावरून उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विद्यापीठ प्रशासनाकडे सुधारणा करण्याची मागणी करत कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले आहे.
दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यापीठाने ७३ शिक्षक पदांसाठी (प्राध्यापक ३, सहयोगी प्राध्यापक २०, सहायक प्राध्यापक ५०) भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी एकूण ५८१५ उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, नंतर शासनाच्या नवीन १००-बिंदू आरक्षण नामावली व SEBC आरक्षण लागू झाल्याने जाहिरात रद्द करण्यात आली होती.
सुमारे दीड वर्षानंतर विद्यापीठाने दि. २ एप्रिल २०२५ रोजी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून, सर्व उमेदवारांना नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये मागील अर्जदारांनाही पुन्हा अर्ज व शुल्क भरावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत व अनेक वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
प्रा. डॉ. दौलतराव घोलकर यांनी तमाम पात्रताधारक उमेदवारांच्या वतीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देत मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये मागील जाहिरातीत अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करावी, नव्याने अर्ज न करता त्यांचाच विचार करावा, नवे पात्रता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा द्यावी, व स्पेशलायझेशनबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करणारे शुद्धिपत्रक प्रकाशित करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
“वर्षानुवर्षे NET/SET/PhD प्राप्त करूनही भाजीपाला विकणे, रिक्षा चालवणे, किंवा वेटर म्हणून काम करणे अशी दयनीय अवस्था झालेल्या असंख्य पात्र उमेदवारांना विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेकडून पारदर्शकतेची व न्यायाची आशा आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठाने सात दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास कायदेशीर लढाईचा इशारा देखील उमेदवारांनी दिला आहे अशी माहिती प्रा. डॉ. दौलतराव घोलकर यांनी दिली आहे.

\"\"
\"\"
Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठविद्यापीठ
Previous Post

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

Next Post

हिप्परगा (सय्यद) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Related Posts

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मराठवाडा

गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु ; धरणातील गाळ उपसा करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

हिप्परगा (सय्यद) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!