लोहारा शहरात शनिवारी (दि.३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि.३१) जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, माजी सरपंच नागन्ना वकील, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, चंद्रकांत पाटील, शंकर जट्टे, प्रकाश भगत, डॉ. गुणवंत वाघमोडे, डॉ. आम्लेश्वर गारठे, दत्ता गाडेकर, अविनाश माळी, प्रशांत काळे, विजयकुमार ढगे, प्रमोद बंगले, अमोल बिराजदार, आयुब शेख, दिपक रोडगे, श्रीकांत भरारे, दिपक मुळे, के.डी. पाटील, श्याम नारायणकर, विक्रांत संगशेट्टी, इकबाल मुल्ला, रौफ बागवान, दगडू तिगाडे, सुधीर घोडके, जगदीश लांडगे, रघुवीर घोडके, बाबा शेख, अंबादास विरुधे, विकास घोडके, सुरेश वाघमोडे, प्रमोद पोतदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. जयंतीनिमित्त शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि.१) अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रेम लांडगे, उपाध्यक्ष आकाश विरोधे, सचिव प्रदिप घोडके यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि.३१) हे शिबीर घेण्यात आले. श्रीगिरे हॉस्पिटल व जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. हेमंत श्रीगिरे, नगरसेवक प्रशांत काळे, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, रघुवीर घोडके, हरी लोखंडे, सुरेश वाघमोडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रेम लांडगे, उपाध्यक्ष आकाश विरुधे, अंबादास विरुधे, विकास घोडके, उमेश देवकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. या शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरात सह्याद्री ब्लड बैंकेचे डॉ.शशीकांत करंजकर, आलकेश पोहरेगावकर, तेजस कनेरे, अनुजा नाईकवाडी यांनी रक्तसंकलन केले.






