Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

by मुख्य संपादक
in महाराष्ट्र
A A
0

मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेटी दिल्या. तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी – सुविधाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे.

यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती ३ वर्षासाठी दिली जाईल,परंतु १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधाचा फेर आढावा घेऊन पुढील २ वर्षीच्या मुदतवाढीबाबत विचार केला जाणार आहे.तसेच या हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता,अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जावा,असे देखील निविदा प्रक्रियेत नमूद केले जाणार आहे.तसेच या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे.त्यांच्या वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे.त्यामुळे भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करण्यात येणारा आहे.तसेच संबंधित हॉटेल तामिनी महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफ.आय.आर.देखील दाखल केला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे.तसेच मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी या हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत.

एकंदर प्रवाशांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची निवड करावी,तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूल देखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल – मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

Tags: प्रताप सरनाईकराज्य परिवहन
Previous Post

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

Next Post

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!