शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी तसेच बच्चू कडू यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी लोहारा येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.१०) लोहारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांना हे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आपण आपले सरकार आल्यास संपूर्ण शेतकऱ्याची कर्ज माफी करणार असे तुम्ही स्वतः जाहीर केले होते. त्याचे स्मरण करून देण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू अमरावती जिल्ह्याच्या मोजरी गुरु-कुंज येथे शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्ज माफीसाठी उपोषण करीत आहेत. त्यांच्या या मागणीस महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचा पाठींबा आहे. तरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही स्वताचा शब्द पळून शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज माफीची घोषणा करावी व सर्व शेतकऱ्याना न्याय देऊन शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आयनोद्दीन सवार, सलीम शेख, अमोल बिराजदार, विरेश स्वामी, रौफ बागवान, बसवराज पाटील, निशिकांत गोरे, सुधीर घोडके, तुकाराम वाकळे, शिवमूर्ती मुळे, महेबूब गवंडी, भगवान मक्तेदार, प्रशांत लांडगे, शिवन काडगावे, प्रभाकर खराडे, शंकर होंडराव, शकील पटेल आदींसह शेतकरी उपस्थित होते.
