लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा), शिवकरवाडी, लोहारा (खु.) व खेड येथील शेत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील व उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शरण पाटील फाऊंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२६) शेतरस्त्याचे काम करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन शेतीमाल बाजारात लवकर दाखल व्हावा यासाठी शेतापर्यंत रस्ते असणे गरजेचे आहे. शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्ते मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेऊन, शेतकरी हित जपण्याचा उद्देशाने लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतरस्ते महाराष्ट्रात आदर्श पॅटर्न करण्याचा संकल्प करुन ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या लोकवाट्याची सर्वस्वी जबाबदारी शरण पाटील फाऊंडेशनने स्वीकारली आहे. संकल्पाचे सिध्दीत रुपांतर करण्यासाठी लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा), शिवकरवाडी, लोहारा (खु.) व खेड येथील शेतरस्ते कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील व उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२६) करण्यात आले.
यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, जिपचे उपविभागीय अभियंता दिलीप बिराजदार, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, योगेश राठोड, बाजार समितीचे सभापती प्रशांत काळे, नितीन पाटील, हरी लोखंडे, बाबा सुर्यवंशी, विजय लोमटे, हिप्परगा (रवा) सरपंच अभिमान कांबळे, खेडच्या सरपंच राजश्री कांबळे, महेश माशाळकर, ब्रम्हानंद पाटील, बालाजी वडजे, व्यंकट रसाळ, लोहारा (खु.) चे सरपंच सचिन रसाळ, विलासपूर पांढरीचे सरपंच मारुती कार्ले, विनोद मोरे, आप्पा होनाळकर, सुनिल जाधव, सिध्देश्वर गव्हाळे, व्यंकट पाटील आदीसह हिप्परगा रवा, शिवकर वाडी, लोहारा खु. व खेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
