महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व परिषद मंडळ महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत शिक्षक व कर्मचारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय स्पर्धा लातूर येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची शालेय स्तरावर विविध क्लब सादरीकरणांमध्ये राज्यस्तरावर निवड झाली. शालेय विविध क्लबमध्ये मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी गणित क्लब याबद्दल माहिती दिली व गणिताचे फायदे व विद्यार्थ्यांना त्याची आवड निर्माण व्हावी याबद्दल मार्गदर्शन केले. गणित हा विषय विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सोपा करून दाखवता येईल याबद्दल प्रात्यक्षिक दाखवले. या यशाबद्दल मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचे सर्व शिक्षकांकडून व अधिकारी वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.





