लोहारा तालुक्यातील माकणी येथील शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांनी साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.
लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेत बुधवारी (दि.१७) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात शिक्षक शैक्षणिक साहित्य गटात एकूण चार शिक्षकांचे साहित्य आले होते. तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांच्या गणित विषयाच्या स्वयंअध्ययन साहित्याची प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. याबद्दल शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी यांचा आ. प्रवीण स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्तार अधिकारी विश्वजित चंदनशिवे, मुख्याध्यापक दयानंद पोतदार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.





