उमरगा तालुक्यातील बलसुर गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सविताताई सुरेश बिराजदार निवडणूक लढवत आहेत. रविवारी (दि.२५) त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
सर्वप्रथम बलसुर येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच हनुमान मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, नवीन गाव हनुमान मंदिर व दत्त मंदिर येथे या सर्व ठिकाणी नारळ फोडून विजयाचा संकल्प करण्यात

आला. याप्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, बलसूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सौ. सविताताई सुरेश बिराजदार यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला. यावेळी महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. “घड्याळ” या चिन्हासमोरील बटण दाबून सविताताई बिराजदार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, पंचायत समिती गणाच्या उमेदवार अर्चनाताई साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, युवक तालुकाध्यक्ष बाबा पवार, साहेबराव पाटील, शमशोद्दीन जमादार, माजी सरपंच जयश्री नांगरे, बलसुरच्या सरपंच अश्विनी भोसले, कलदेवलिंबाळाच्या उपसरपंच सुनीता पावशेरे, ज्येष्ठ कार्यकर्ता मुकुंद चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, प्रदीप पाटील, वसंत साखरे, संजय गव्हाणे, महादेव नांगरे, पवन पाटील, उपसरपंच आयुब पाटील, राजू मुगळे, मनीषा जाधव, शोभा नांगरे, सरुबाई पवार, जयचंद्र जाधव, प्रताप मोहिते, शबाना शेख, पुष्पाताई पाटील, रंजना बिराजदार,

लक्ष्मी बिराजदार, पूजा बिराजदार, शोभा भोसले, चंद्रकांत भोसले, गुलाब चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, मोहन राठोड, पिंटू चव्हाण, रोहिदास चव्हाण, विपुल चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, मिथुन चव्हाण, महादेव चव्हाण, दिलीप चव्हाण, सुनंदा भरत रणखांब, पुष्पाबाई बिराजदार, अंजीर रणखांब, संतोष शिंदे, संजय रणखांब, उद्धव रणखांब आदीसह बलसुर गटातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बलसुर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सविताताई सुरेश बिराजदार यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.







