लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रकारच्या गीतांवर सादरीकरण केले.
तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष किशोर बोमणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रवीण गोरे, मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया माळवदकर यांच्यासह समितीचे सदस्य, गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व पालक उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन

बाळासाहेब कदम व मेघराज कदम यांनी केले. यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, कोळी गीत, गवळण गीतांवर नृत्य केले. तसेच कॉमेडी कीर्तन, पर्यावरण यावर आधारित नाटक ,भारुड इ. सादरीकरण करण्यात आले. संमेलनाला विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्व गावातील नागरिकांचे आभार मानले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सुप्रिया माळवदकर यांच्यासह प्रिया दरेकर व शाळेतील शिक्षकांनी या स्नेहसंमेलनासाठी परिश्रम घेतले.








