वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्या शितलताई पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.५) तालुक्यातील राजेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या शितलताई पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, मुख्याध्यापक दिपक पोतदार, शरद पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी के देशमुख, विस्तार अधिकारी निंबाळकर, ग्रामसेवक श्री. मोरे यांच्यासह अविनाश देशमुख, बी. आर. देशमुख, जगताप सर, कोरे सर, महाजन मॅडम, हरिभाऊ कोळी, प्रभाकर घंटे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितलताई पाटील यांनी कोविड परिस्थिती ची माहिती घेऊन नियमांचे पालन करण्यात यावे असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी शाळेच्या अडचणी जाणून घेतल्या.