लोहारा तालुक्यात शनिवारी (दि. ५) विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोहारा तहसिल कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. वनपरिमंडळ अधिकारी एस. डी. माळी, वनरक्षक जि.एल.दाडंगे, ए.जी.चौगुले, तहसिल कार्यालयचे महसुल सहायक सुर्यवंशी, वजीर अत्तार, भागवत गायकवाड यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.