वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात शनिवारी (दि. ५) विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी एकूण ५० झाडे लावण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, तीनपूर्णी यासह इतर वृक्ष लावण्यात आले. वृक्षारोपणासाठी नोडल ऑफिसर शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच राम मोरे, ग्रामसेवक श्री. मुंडे, तलाठी श्री. कांबळे, पोलीस पाटील संजय नरगाळे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अनिल आतनुरे, मुख्याध्यापिका कांबळे मॅडम यांच्यासह एस एम शेख, एन एस बंगले, जी के जाधव, एस के राठोड, एस आर घोडके, एस बी परीट, एस बी बिडवे आदी शिक्षक उपस्थित होते.





