वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ग्रामपंचायत नागुर व लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागुर येथे सुरू करण्यात आलेल्या ३० बेडच्या संस्थात्मक विलगिकरण केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते रविवारी (दि. ६) करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील नागुर येथे ग्रामपंचायत नागुर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३० बेडचे संस्थात्मक विलगिकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला हॅलो मेडिकल फौंडेशन अणदूर व मानवलोक संस्थाअंबेजोगाई यांच्या वतीने मदत करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि.६) करण्यात आले. या केंद्रात दाखल होणारे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन सुखरूप घरी परतावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी दिल्या. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व हॅलो मेडिकल फाउंडेशनचे सतीश कदम यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे, सरपंच गजेंद्र जावळे, ऍड. सेलचे तुकाराम मोरे, ग्रामसेवक मातोळे, जेष्ठ नेते किशोर नाना साठे , गोविंद तात्या साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, प्रकाश भगत, शहराध्यक्ष आयुब शेख, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, बहादूर मोमीन, नवाज सय्यद, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, बालाजी मेनकुदळे, दादा जानकर, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, संजय जाधव, वैजनाथ कागे, रवी राठोड, लक्ष्मण बिराजदार, दयानंद थोरात आदी उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील नागरिकांमध्ये कोविड १९, लसीकरण याबाबत जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.