यावेळी कृषि सहायक स्वामी यांनी बीबीएफ यंत्र, शासकीय योजना याबद्दल माहिती दिली. अडचणीच्या काळात ही मदत मिळाल्यामुळे या महिलांनी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालम, प्रोजेक्ट डायरेक्टर उपमन्यू पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर तबसुम मोमीन यांचे आभार मानले. यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सुपरवायझर शितल रणखांब, लिडर दिपाली चव्हाण व लाभार्थी उपस्थित होते.