यावेळी सुकन्या महिला ग्रामसंघास भेट देऊन महिलांना एक महिला एक झाड लावून वृक्षरोपण करावे याबाबत प्रकल्प संचालक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सुंदर माझे गाव उपक्रमात गावाची निवड करण्यात येणार असून बचतगट महिलांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसेच गटाच्या मार्फत नर्सरी सुरू करण्यात यावी याबाबत माहिती दिली. उमेद अंतर्गत सुरू केलेल्या तिरुपती भाजीपाला मार्टला भेट देऊन व्यवसायिक महिलांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. तसेच गावातील विविध विकास कामास प्रकल्प संचालक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रभाग समन्वयक त्रिंबक लहाने हे उपस्थित होते. या भेटीचे यशस्वी नियोजन सीआरपी मुमताज शेख व ग्रामसंघ पदाधिकारी महीला यांनी केले.