लोहारा नगरपंचायत निवडणूक पुढील काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (आय) पक्षातील ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस आय पक्षाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.