वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी यासाठी शुक्रवारी (दि.२५) घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. तसेच लसीकरणाबाबत महत्व पटवून देणारे माहितीपत्रक वाटण्यात आले.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे रुग्ण संख्या वाढत चालली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील, ग्रामपंचायत सास्तुर यांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी लसीकरणास म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सास्तुर गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी व नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन करण्यासाठी सास्तुरच्या जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील, माजी जि प सदस्य राहुल पाटील, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार यांच्यावतीने एक माहितीपत्रक काढण्यात आले आहे. या माहितीपत्रकात लसीकरणाबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. गावातील १८ वर्षापुढील नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) घरोघरी जाऊन आवाहन करण्यात आले.गावातील एकूण ५ वार्ड साठी ५ टीम तयार करण्यात आल्या. या टीमने वार्ड मधील प्रत्येक घरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच माहितीपत्रक देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील, राहुल काकासाहेब पाटील सरपंच यशवंत कासार, ग्राप सदस्य छाया पवार, मयुरी चिमुकले, सात्तपा चिवरे, सतीश यादव, फझल कादरी, राहुल औसेकर, ग्रामसेवक डी. आय. गोरे, ग्रा.प कर्मचारी बाबू सुतार, जैनू कोतवाल, नयेश्वर कांबळे, आशा कार्यकर्ती आदींनी परिश्रम घेतले.
No Result
View All Result
error: Content is protected !!