वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील अनेकांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यांच्यासह अनेकांनी उमरगा येथे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते गुरुवारी ( दि. १) शिवसेनेत प्रवेश केला आहे.
लोहारा शहरातील अनेकांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे दिला होता. त्यानंतर राजीनामा दिलेले हे कार्यकर्ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता होती. अखेर या सर्वांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, श्रीशैल्य स्वामी, राजेंद्र क्षिरसागर, अमोल माळी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांनी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.
यावेळी सुलतान शेठ, रजाक अत्तार, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, युवासेना लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, शहरप्रमुख सलीम शेख, श्रीकांत भरारे, सुधीर घोडके, प्रमोद बंगले, अमीन सुम्बेकर, महेबूब गवंडी, बालाजी माशाळकर, भरत सुतार, शिवा सुतार आदींसह उमरगा लोहारा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





