वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे व हराळीचे नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा शनिवारी (दि.४) लोहारा पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.तालुक्यातील हराळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. मागील चार दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. तसेच हराळी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल या दोघांचा हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि.४) सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांचे गाव म्हणून हराळी गावाची उस्मानाबाद जिल्ह्यात ओळख आहे. त्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले. यावेळी हराळीचे उपसरपंच रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी, युवराज पाटील, रमेश सुर्यवंशी, भैय्यासाहेब धाडवे, सुनील रनखांब, दगडू सय्यद, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, श्रीराम धानुरे, अनिल बिराजदार आदी उपस्थित होते.