वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची उपविभागीय पातळीवरील बैठक राज्य संयुक्त सचिव कॉम्रेड बी. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच उपविभागीय पातळीवरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, उपाध्यक्षपदी कॉ. लक्ष्मण कांबळे, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत संघटनेची इतर कार्यकारिणीही निवडण्यात आली. संघटकपदी कॉ. बाळासाहेब घोडके, कार्याध्यक्ष म्हणून कॉ.एस एस माळी यांची निवड करण्यात आली. तसेच शाखाप्रमुख कॉ. वसंत पवार- सास्तूर २, कॉ. बालाजी चौगुले -सास्तूर १, कॉ. सुरेश पवार लोहारा, कॉ. नवनाथ सुगावकर येणेगुर १, कॉ. अमर पेठसंगे येणेगुर २, कॉ. संजीवन सुरवसे जेवळी आदींची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परवेज पठाण, कॉम्रेड कलीम खुटेपाड, कॉम्रेड सचिन शित्रे, कॉम्रेड अरुण कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.




