वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात महाशिवरात्री निमित्त मंगळवारी (दि.१) जगदंबा मंदिर ते महादेव मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम संपन्न झाले.
लोहारा शहरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी यात्रा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षांपासून कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. यावर्षीही मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम संपन्न झाले. महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी जगदंबा मंदिर ते महादेव मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात भजनी मंडळासह नागरिक, युवक सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी भारुडाचा कार्यक्रम व सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. बुधवारी (दि. २) महादेवी नणंदकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाशिवरात्री यात्रा कमिटीच्या वतीने कोविड १९ च्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्यात आले.