वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवीन समीकरण दिसणार आहे.
सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी शिवसेना व संभाजी ब्रिगेड युती केल्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आगामी सर्व निवडणुका शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र लढविणार असल्याचेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष ऍड. मनोज आखरे, माजी मंत्री सुभाष देसाई, सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे आदी उपस्थित होते. यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे दिसणार आहेत. भाजपाला रोखण्यासाठी प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याची गरज अनेक प्रादेशिक पक्षांकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यादृष्टीने ही एक सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.