वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहर व परिसरात बुधवारी( दि. ७) पहाटे पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
मागील काही दिवसांत लोहारा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ३० ऑगस्ट ला रात्री लोहारा शहरासह कानेगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे लोहारा शहरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. यावेळी लोहारा येथे तब्बल १२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. रविवारी पहाटेही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी पहाटे पासून जोरदार सुरुवात केली आहे. सकाळी ७.४० च्या सुमारास हा पाऊस बंद झाला. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.