वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील बालाजी गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.१३) पशुवैद्यकीय दवाखाना माकणी येथे गावातील जनावरांना लंम्पी या आजाराची लस मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या लंपी या आजारामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन बालाजी गणेश मंडळाच्या वतीने ५०० लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. यावेळी सरपंच विठ्ठल साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अच्युत साठे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन बालाजी साठे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडीत ढोणे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन आलमले, बाळू कांबळे, अच्युत चिकंद्रे, तात्याराव कांबळे, नागनाथ पत्रिके, अनिल ओवांडकर, शुभम साठे, गणेश पाटिल, अजित पाटिल, राहुल साठे, कमलाकर इंगळे, संजय साठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित उत्तम साठे, उपाध्यक्ष महेश सुधाकर सगर, सचिव सौरभ विजय पाटील, सदस्य अभिषेक यशवंत साठे, संतोष बळीराम साठे, रितेश नेताजी साठे, कानिफनाथ ज्योतीनाथ सूर्यवंशी, अनिकेत गौतम साठे, ओमकार प्रभाकर सगर, विश्वजीत विकास पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डाॅ. एस. एस. ताकभाते व परिचारक डी. सी. मोरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.